खेड : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

banner 468x60

खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. खेड तालुक्यात १५१ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १४४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


त्यामुळे नगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगबुडी व नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नद्यांच्या लगत असलेली शेती व वीटभट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत.


पावसाचा जोर वाढत असून, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. संततधार पावसामुळे खेड मटण-मच्छीमार्केट परिसरासह देवणे बंदर भागात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी घुसले.

त्यामुळे मच्छीमार्केट परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी सतर्कतेचे पाऊल म्हणून दुकानातील माल अन्य साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरवात केली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, १७ तारखेपासूनच खेडमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. प्रशासनाने नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सावधानता व सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शेतीची लावणीची कामे सुरू असली तरी नदीच्या किनाऱ्यावरील शेतजमिनीमध्ये शेतकऱ्यांनी शक्यतो दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शहरासह ग्रामीण भागातील लहान-मोठ्या नद्या, ओढे-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने तालुक्यातील जगबुडी व नारिंगी या दोन प्रमुख नद्यांनी रौद्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे.

आज सकाळी ८ वाजता जगबुडी नदीने ८.५० मिटरची पातळी गाठली होती. त्यानंतर जलस्तर वेगाने वाढला असून, सकाळी नऊ वाजता जगबुडी नदीने ९ मिटरची पाणीपातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यावर मासेमारीसाठी कोणीही जाऊ नये, अशा सूचना केल्या आहेत.

पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकदेखील धिम्या गतीने सुरू आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *