हर्णे : बायपासवर खड्डयांचे साम्राज्य

banner 468x60

हर्णे बायपासवर खड्डेच खड्डे पडल्याने बायपासवर पडलेले खड्डे चुकवत वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यात वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

दापोली तालूक्यातील व्यापार आणि पर्यटनासाठी महत्वाचा असा मार्ग असलेल्या हर्णे बायपासची सध्या खड्डे पडून झालेली दुर्दशा ही वाहतुकीला अडथळा ठरणारी अशीच आहे.

त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून हा मार्ग धोकादायक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला हा मार्ग खड्डे मुक्त करण्यासाठी बांधकाम विभागाने पावले उचलणे गरजेच आहे.

नाहीतर एक दिवस या मार्गावर एखादयाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीची वाट न पाहता लवकारात लवकर हा मार्ग खड्डे मुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.