दापोली : किरकोळ कारणावरून सलमान दिवेकरची गरीब कुटुंबावर दादागिरी , मारहाण, घराचं 1 लाखांचं नुकसान

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यातील आडे गावात क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून मारहाण झाल्याची घटना 3 जून रोजी घडली आहे.

दिवेकर कुटुंबात कौटुंबिक वाद सुरु आहेत .

banner 728x90 banner 728x90

दरम्यान 1 जून आणि 2 जून ला सलमान दिवेकर याने समीरा दिवेकर यांच्या घराचं नुकसान करुन घरातील वस्तूंच मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.

सलमान दिवेकर याने आमच्या घराचं नुकसान केल्याचा आरोप समीरा दिवेकर यांनी केलाय. रविवारी आणि सोमवारी अल्मास दिवेकर यांनी आमच्या घराचं नुकसान केल्याचं समीरा दिवेकर यांनी सांगितलं आहे.

दापोली पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सलमान दिवेकरने 1000 लिटरची पाण्याची टाकी, 650 लिटरची पाण्याची टाकी, 15 लिटरच्या 15 ते 20पाण्याच्या भरण्या फोडल्या असून पाण्याच्या मोटारीचं नुकसान केलं आहे.

होडीचा सामान भरतीच्या पाण्यात टाकून नुकसान केलं आहे. घराच्या स्लायडींगच्या काचा दगड मारून फोडल्या असल्याचं समीरा दिवेकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान हा सलमान आम्ह्याला कधीही त्रास देत असल्याचं समीरा दिवेकर यांचं म्हणणं आहे.

आम्ही घरी मी आणि माझी मुलगी एकटीच असल्याने भीतीचं वातावरण निर्माण केल्याचं समीरा दिवेकर यांनी सांगितलं. अदखलपात्र अहवालात असं म्हटलं आहे की आडे मोहला येथील तक्रारदार व विरोधक हे एकमेकांचे नातेवाईक असुन ते एकाच घरात विभक्त राहतात.

तक्रारदार व विरोधक यांच्यात वडिलोपार्जित घराचा हिस्सा वाटपावरुन गेली 10 वर्षापासुन वादविवाद आहेत. यातील विरोधक यास दारू पिण्याचे व्यसन असुन विरोधक हे घराच्या खालील भागात आणि तक्रारदार हे घराच्या वरील भागात राहत आहेत.

साक्षीदार क्र.1 व 2 घरी नसताना विरोधक यांनी तक्रारदार यांचे घराचे खालचे बाजूला ठेवलेले पाण्याचे हजार लिटरचे तीन ड्रम फोडून, स्लाईडींग खिडकी, पाण्याचा नळ पाईप व मोटर फोडून, मासळीच्या जाळी पाण्यात टाकून नुकसान केलेले आहे.

तक्रारदार आणि साक्षीदार यांनी घरी येवून पाहिले असता याबाबत विचारणा केली असता विरोधक यांनी तक्रारदार आणि साक्षीदार यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याच तक्रारदार यांनी म्हटलं आहे.

सदरची एन.सी दाखल करुन सदर एन. सी.चा तपास मा. वरिष्ठांकडे दिला आहे. आता या दादागिरी करणाऱ्या सलमानला दापोली पोलिस पोलिसी खाक्या दाखवून सलमानची भाईगिरी उतरवणार का हे पहावं लागणार आहे. याबाबतचा अधीक तपास दापोली पोलीस निरीक्षक आहिरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *