गुहागर : एचपी गॅस एजन्सी कडून होत असलेल्या तपासणी शुल्कात ग्राहकांना दिलासा मिळावा – रियाज ठाकूर

banner 468x60

गुहागरच्या चंद्रभागा गॅस एजन्सी कडून संपूर्ण गुहागर तालुक्यात गॅस जोडणी ग्राहकांच्या घरोघरी जाऊन गॅसपाईप, गॅसशेगडी, रेगुलेटर यांची तपासणी केली जात आहे.

हे सर्व ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी असले तरी ही मोहीम राबवली जात असली तरी तपासणीचे शुल्क 236/- रुपये प्रमाणे घेतले जात आहे.

तालुक्यातील सर्वसामान्य गॅस जोडणी ग्राहकांना हे शुल्क परवडणारे नाही. खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे हे शुल्क कमी करून ग्राहकांना दिलासा द्यावा.

अन्यथा ही मोहीम स्थगित करण्यात यावी. अशी मागणी गुहागर काँग्रेस तालुकाअध्यक्ष रियाज ठाकूर यांनी गुहागर तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *