गुहागर : माहिमकर मोहल्ला येथून व्हॅगनार चोरीला

banner 468x60

गुहागर शहरातील माहिमकरमोहल्ला येथून रविवारी रात्री इब्राहिम मोईदि्दन माहीमकर यांचे व्हॅगनार चार चाकी क्रमांक एमएच 05 एबी5475 चोरीला गेल्याची फिर्याद गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.


माहीमकर हे रविवारी रात्री काम आटपून घरी आले असता नेहमीप्रमाणे गुहागर वेलदूर रस्त्यावर चार चाकी लावली होती. गाडीचे एका साईडचे काच लागत नसल्याने उघडी होती. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने हे गाडी चोरल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे.

सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे माहीमकर गाडी जवळ आले असता येथे गाडी नसल्याचे लक्षात आले सर्वत्र दोन दिवस शोध घेतला असता कुठेच मिळून आल्याने आज गुहागर पोलीस ठाण्यात पर्यंत दाखल केली आहे.

रात्री १ वाजताच्या सुमारास नारायण मंदिर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही गाडी रस्त्यावरून गेल्याचे दिसून येत असल्याने गुहागर बाजारपेठ दिशेने चोरट्याने गाडी नेली असावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *