गुहागर :श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा

banner 468x60

ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचा सत्कार

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथील श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात महाशिवरात्री उत्सव उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

banner 728x90


या महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा आणि दर्शनाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला.
यानिमित्त सकाळी अभिषेक, दुपारी श्री सत्यनारायणाची महापूजा, महिलांचा हळदीकुंकू, संध्याकाळी वाडीतील लहान-थोर, महिलावर्ग तसेच तरुणांनी संगीत खुर्ची, चमचा गोटी अशा विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन स्पर्धेचा आनंद लुटला. संध्याकाळी महाआरती आणि महाप्रसाद व त्यानंतर कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वाडीतील ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाला पाटपन्हाळे ग्रामपंचायतचे सरपंच श्री.विजय तेलगडे, उपसरपंच श्री.आसीम साल्हे, माजी सभापती श्री.सुनील पवार, ग्रा. पं.सदस्य श्री.चंद्रकांत तेलगडे, ग्रा पं. माजी सदस्य श्री.अमरनाथ मोहिते, पत्रकार श्री.योगेश तेलगडे, पोलीस पाटील सौ. रसिका खैर, शारदा मित्र मंडळ तेलगडेवाडीचे अध्यक्ष श्री.अमित तेलगडे , त्रिमूर्ती ऐक्य मंडळ पागडेवाडीचे अध्यक्ष श्री.अनंत पागडे, श्री शिवदेव बेलवृक्ष उत्कर्ष मंडळाचे मुंबई अध्यक्ष श्री. सुहास गावडे, श्री. अनंत गावडे, महिला मंडळ अध्यक्षा सौ. रेश्मा गावडे तसेच मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.

मुलांना आपली कला सादर करण्यासाठी रात्री मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री.संतोष गावडे यांनी केले.

 
banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *