जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये गुहागर तालुका आरोग्य अधिकारी जी पी जांगिड यांचा
शाळेच्या अमृत महोत्सवातील प्रकाशित करण्यात आलेली स्मरणिका व पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील, आरोग्य सहाय्यक सचिन चौगुले ,राठोड सर, अशोक कुंभार ,योगा टीचर आदिती धनावडे ,शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार ,धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड ,अफसाना मुल्ला इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
योगा प्रशिक्षक आदिती धनावडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून योगा प्रात्यक्षिक करून घेतले .पायाभूत चाचणीचे मूल्यांकन करण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी जांगडे यांनी शाळेला भेट दिली .
मराठी विषयाची तोंडी परीक्षा चाचणीतील प्रश्नांची पडताळणी संख्याज्ञान व त्यावरील क्रिया ,शाब्दिक उदाहरणे, इंग्रजी विषयाचे ज्ञान यावर आधारित विविध प्रश्न विचारले. जिल्हा परिषद आदर्श शाळा वेलदूर नवानगर शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व प्रगती बद्दल त्यांनी गौरव उद्गार काढले .वेलदूर नवनगर शाळेमध्ये राबवीत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. शालेय परिसरातील स्वच्छता याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले .विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी पौष्टिक अन्नाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
दुकानातील कुरकुरे तस्सम पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक आहेत. विद्यार्थ्यांनी नियमित योगसाधना करावी व पुरेसा व्यायाम व शारीरिक हालचाली कराव्यात, मनसोक्त खेळावे .विद्यार्थ्यांनी चांगल्या आरोग्य विषयक सवयी जपल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यमान सुधारते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मुद्दमवार तर आभार प्रदर्शन धन्वंतरी मोरे यांनी केले

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*