गुहागर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गावणकर यांचा गुहागर प्रभाग शिक्षकांच्या वतीने भव्य सत्कार

banner 468x60

गुहागर (प्रतिनिधी) ३९ वर्षे शिक्षण क्षेत्रात दैदीप्यमान कार्य केल्यानंतर गुहागर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी अशोक रामचंद्र गावणकर

banner 728x90

हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल गुहागर प्रभागातील शिक्षकांच्या वतीने शाल, श्रीफळ ,भेटवस्तू देऊन भव्य सत्कार करण्यात आला .त्यावेळी गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, माजी शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद कासार ,शिक्षण विस्तार अधिकारी नसरीन खडस, दापोलीचे केंद्रप्रमुख रविकिरण बुरटे

,दापोलीचे केंद्रप्रमुख शशिकांत तेतांबे तांबे,केंद्रप्रमुख खेतले ,सीमा कदम मॅडम, संतोष कोलते सातारा ,मनोज मिरगुले रत्नागिरी, ज्ञानेश्वर चिले मुंबई, केंद्रप्रमुख सुरेश कदम, माजी केंद्रप्रमुख रमेश जागकर ,केंद्रप्रमुख सुभाष पवार ,केंद्रप्रमुख देवळेकर, केंद्रप्रमुख शिगवण , अस्मिता अशोक गावणकर, शिक्षक नेते अरविंद पालकर, संघाचे दीपक साबळे, अखिल प्राथमिक संघाचे मनोज पाटील ,शिक्षक समितीचे नरेंद्र देवळेकर, जुनी पेन्शन समिती अमोल धुमाळ, नरेंद्र सुर्वे मित्रमंडळी परिवार व कुटुंबीय तसेच गुहागर प्रभागातील व तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख नामदेव लोहकरे हे होते .कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव क्षीरसागर यांनी केले .त्यावेळी सर्व शिक्षक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .

त्यावेळी अशोक गावणकर यांनी सर्वांचे आभार मानून आपले ऋणानुबंध असेच कायम राहतील असे अभिवचन दिले. माझ्या एकंदर वाटचालीत माझे सहकारी ,पालक, पदाधिकारी व अधिकारी कुटुंबीय ,माझी पत्नी अस्मिता , गावणकर यांनी मोलाची साथ दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर पावसकर व दीपक रामाणे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *