गुहागर :पालशेत विद्यालयाच्या यश आग्रेचे उत्तुंग यश

banner 468x60

दहावीच्या परीक्षेत मिळविले ९९ टक्के गुण

पाटपन्हाळे (वार्ताहर ) गुहागर तालुक्यातील रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक विद्यालय पालशेत शाळेतील विद्यार्थी यश किशोर आग्रे याने ९९.०० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

तर गुहागर तालुक्यात द्वितीय क्रमाकाने उत्तीर्ण झाला आहे. आपले पाल्य इयत्ता दहावी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी पालक जिवाचे रान करतात. हजारो रुपये खर्चुन पालकांकडून मुलांना कोचिंग क्लासेस लावले जातात. इतके करूनही यशाची खात्री अत्यंत कमी असते, पण जिद्द आणि चिकाटी असेल तर संकटांवर धीराने मात करीत कोणताही क्लास न लावता यश मिळवता येते.

याचा प्रत्यय गुहागर तालुक्यातील पालशेत विद्यालयातील यश आग्रे याने केला आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! पालशेत सारख्या ग्रामीण भागात यश चे हे यश वखाणन्याजोगे आहे. अभ्यासात सातत्य, पालक, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे आपण हे यश संपादन केल्याचे यश याचे म्हणणे आहे. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *