गुहागर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी शृंगारी मोहल्ला येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम
दि.5 मार्च रोजी शृंगारी मोहल्ला येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ॲक्शन सॉंग, देशभक्तीपर गीत, नाटक, बालगीत, कोकणी कॉमेडी,अन्य विविध प्रकारच्या गीतांवर आपली नृत्य कला सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
उपस्थित प्रेक्षकांकडून शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व आजी माजी शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
ग्रामपंचायत पाटपन्हाळेचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसीम साल्हे, सदस्य शब्बीर शेख, रियाज ठाकूर, जानवळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुबीन ठाकूर, तालुका मुस्लिम अध्यक्ष साबीर भाई साल्हे, जमात अध्यक्ष हुसेन बोट, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष जुने तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे शालेय व्यवस्थापन समितीकडून पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले.
स्नेहसंमेलन यशस्वी होण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक, पालक तसेच शालेय व्यवस्थापन समिती यांनी विशेष मेहनत घेतली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*