गुहागर :श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात महाशिवरात्री उत्सव

banner 468x60

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथील श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात सालाबादप्रमाणे याहीवर्षी शुक्रवार दि.८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाशिवरात्री उत्सवानिमित्त धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    यानिमित्त सकाळी ७ वा.अभिषेक,दुपारी ११ वा.श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी ३ वा. महिलांचा हळदीकुंकू, संध्या. ४ वा. इतर स्पर्धा, संध्या ६ वा. महाआरती,  संध्या ७ ते ९ शिवभंडारा, रात्री ९ वा. सत्कार समारंभ, रात्री १० वा.मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.




असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात अनेक शिवभक्त दरवर्षी हजेरी लावतात. तरी याही वर्षी भाविकांनी दर्शनाचा आणि  कार्यक्रमांचा  लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवदेव बेलवृक्ष उत्कर्ष मंडळ व महिला मंडळ पाटपन्हाळे गावडेवाडी तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *