पांगारी तर्फे वेळब खांबेवाडी येथील अडचणीचा ठरणारा विद्युत खांब हटविण्याबाबत महावितरणला निवेदन

banner 468x60

योगेश तेलगडे
गुहागर तालुक्यातील पांगारी तर्फे वेळब खांबेवाडी येथील अडचणीचा ठरणारा विद्युत खांब हटवण्याबाबत महापुरुष मित्र मंडळ पांगारी तर्फे वेळब खांबेवाडी व सालबाई देवी महिला मंडळ यांच्या वतीने मागणी करण्यात आली.

banner 728x90

अनेक दिवस मागणी करूनही महावितरणच्या वतीने कोणतीच कारवाई होत नसल्याने या वाडीतील नागरिकांनी मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर विधानसभा उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्याकडे याबाबतची कैफियत मांडली.

ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून सार्वजनिक ठिकाणी अडचण निर्माण करणारा तो खांब त्वरित बदलण्यात यावा. अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की,महापुरुष मित्र मंडळ पांगारी तर्फे वेळब खांबे वाडी येथे
सार्वजनिक कार्यक्रमांसाठी जो चबुतरा बांधला आहे , त्याच्या मधोमध वीजेचा खांब असून तो अडचणीचा ठरत असल्यामुळे त्या ठिकाणी सभागृह बांधणे शक्य होत नाही.

त्यातच तो विद्युत खांब अतिशय जीर्ण झाला असून त्याच्या पासून फार मोठा धोका निर्माण झाला आहे. आपणास विनंती करण्यात येत आहे की, सदर विजेचा खांब त्वरित काढावा व पुढील विकास कामांसाठी सहकार्य करावे. सदरची कार्यवाही येत्या पंधरा दिवसात व्हावी अशी गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी , उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी मागणी केली आहे. सदरचे निवेदन देताना गंगाराम भिकू खांबे सदाशिव यशवंत खांबे,अनंत रघुनाथ खांबे,महेश देवजी खांबे, विद्या दिनेश खांबे, गंगा पांडुरंग खांबे, पार्वती रामचंद्र खांबे,अंकिता जयवंत खांबे
वंदना गोपाळ खांबे, योगिता विष्णू खांबे, शेवंती सखाराम खांबे , सुगंधा लक्ष्मण खांबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *