वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

banner 468x60

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी शाळेमध्ये भारतातील पहिल्या शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका

पहिल्या विचारवंत पहिल्या कवयित्री सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली.

त्यावेळी निमित्त झालेल्या कार्यक्रम प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी श्री अशोक गावणकर साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आले .त्यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी सहव्यवस्थापक श्री दुर्वास वनकर साहेब, अंजनवेल केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ शिगवण मॅडम, पाटपन्हाळे केंद्राचे केंद्रप्रमुख लोहकरे साहेब, मुख्याध्यापक मनोज पाटील, अंजली मुद्दमवार ,परीक्षित दाभोळकर, अंकिता कोळथरकर, आदी मान्यवर व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .त्यावेळी बोलताना श्री . गावणकर साहेब म्हणाले की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. स्वतः शिकून आपल्याबरोबरच्या महिलांना शिकविण्यासाठी त्यांनी महात्मा फुले यांना मोलाची साथ दिली .सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज स्त्रिया सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. स्त्रिया अनेक मानसन्मानाची पदे भूषवीत आहेत ,असे कोणतेही क्षेत्र राहिले नाही की जिथे महिला आघाडीवर नाहीत .स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सावित्रीबाई फुले यांचे योगदान बहुमोलाचे आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जात आहे. सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खूप शिकून मोठे व्हावे व प्रगतीच्या शिखरावर वाटचाल करावी असे त्यांनी मार्गदर्शन पर प्रतिपादन केले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या वतीने एकलव्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेची विद्यार्थिनी कुमारी सलोनी सुदर्शन पालशेतकर, शिक्षण विस्तार अधिकारी गावणकर साहेब, केंद्रीय प्रमुख शिगवण मॅडम, केंद्रीय प्रमुख लोहकरे साहेब यांचा स्मरणिका व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .त्यावेळी मान्यवरांची व शिक्षकांची मनोगते झाली .आभार प्रदर्शन मनोज पाटील यांनी केले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *