गुहागर : नाट्यकलाकर व भजनी गायक श्री.चंद्रकांत दाभोळकर यांना महाराष्ट्र जनता प्रतिष्ठान तर्फे सांस्कृतिक गौरव पुरस्कार प्रदान

banner 468x60

गुहागर (प्रतिनिधी) वेलदूर- नवानगर येथील श्री गणेश नाट्य मंडळाचे कलाकार तसेच श्री गणेश भजन मंडळ नवानगर यांचे भजनी बुवा

banner 728x90

श्री.चंद्रकांत दाभोळकर यांना महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे सांस्कृतिक पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

दाभोळकर हे अनेक वर्षे ते नाट्यक्षेत्रात आपली कला सादर करत आहेत त्यांनी आजपर्यंत नाटकाचे ४२ प्रयोग केले आहेत , त्यांनी कौटुंबिक सामाजिक ,पौराणिक संगीत,रहस्यमयी, कॉमेडी या प्रकारची नाटके केली आहेत. तसेच त्यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने भजनी गायन व नाट्यगीते गाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे यश नाट्यकलाकार व भजनी गायक श्री. चंद्रकांत दाभोळकर यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे सांस्कृतिक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *