शृंगारतली : पोस्ट ऑफिस मध्ये आधारकेंद्र सुरु करण्याची रियाज ठाकूर यांची मागणी

banner 468x60


शृंगारतली: जाहिद मुजावर

काँग्रेस आय चे गुहागर तालुका अध्यक्ष रियाज ठाकूर यांनी शृंगारतली पोस्ट कार्यलयाला निवेदन देऊन बंद असलेले आधारकार्ड केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे.

👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909

banner 728x90

सदर निवेदनामध्ये म्हटले आहे की आपल्या पोस्ट ऑफिस मध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार दुरुस्ती करणे यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य चालू स्थितीमध्ये असताना आपण हे आधार केंद्र बंद ठेवून गरजूंना इतर ठिकाणी जाण्यासाठी सल्ले देत आहात.

यामुळे सर्वसामान्य माणसाची मोठी गैरसोय होत आहे. तरी तातडीने हे अधिकृत आधार केंद्र सुरू करावे अशी मागणी श्री रियाज ठाकूर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *