गुहागर : वरवेली गावात कॅारी धनदांडग्यांचा मुजोरपणा, भूमिपुत्र हवालदिल, मंडल अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधींचं दुर्लक्ष

banner 468x60

गुहागर वरवेली गावातील गावकऱ्यांना सध्या धनदांडग्यांच्या कॅारीमुळे त्रास सहन करावं लागत आहे. गावातील लोकांनी वेळोवेळी आपल्या समस्या प्रशासनाला आणि इथल्या कॅारी मालकांना सांगितल्या आहेत.

मात्र गावकऱ्यांच्या या व्यथांकडे दुर्लक्ष केलं आहे. कुठल्याही प्रकारची पर्यावरणाची हानी होणार नाही तसेच ग्रामपंचायतीला, गावकऱ्यांना कुठेही असुविधा निर्माण होणार नाही याची काळजी स्थानिक प्रशासनाने आणि धनदांडग्यांनी घेणं गरजेचं असतं मात्र गुहागर येथील वरवेली गावात चित्र वेगळं आहे.

banner 728x90

धनदांडगे कशाही प्रकारे निसर्गाची ओरबड करून कामे करत आहेत. धनदांडग्यांनी स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय तर मंडल अधिकाऱ्यांनी मात्र आढावा घेण्याव्यक्तीरिक्त काहीही केलं नाहीय.

गावकऱ्यांनी आंदोलन केली मोर्चे काढले मात्र अजूनही कोणतीच उपाययोजना याठिकाणी पाहायला मिळत नाही. वरवेली गावातील कॅारी निसर्गाची ओरबड करुन झालीच कशी याबाबत प्रशासन नक्की काय करत आहे असा सवाल गावकरी उपस्थित करू लागले आहेत. ही दगड खाण तात्काळ बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

22 नोव्हेंबरला गुहागर मधील वरवेली गावात महसूल विभागाच्या मंडल अधिकाऱ्यांना स्थानिकांनी घेराव घातला होता. स्टोन क्रेशर वरील वाहतूक आणि अवजड वाहतुक अनधिकृत, धोकादायक असल्याचा स्थानिकांनी आरोप केलायं

आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी क्रेशरकडे जाणारा रस्ता स्थानिकांनी रोखला होता. रॉयलटी नसल्यामुळे या गाड्यांवर कारवाई करा अशी स्थानिकांची मागणी आहे. मात्र गावकऱ्यांच्या सर्व मागण्यांकडे मंडल अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे. याबाबत आम्ही वरवेली गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला तर त्यांचं म्हणणं आहे.

“कॅारीमुळे आम्ह्यला नेहमीचा त्रास आहे. याठिकाणी मोठे सुरुंग लावल्याने आमच्या घराला तडे गेलेत. तळीवरून जाणारे ट्रक हे भरधाव जातात, या ट्रकमध्ये ओव्हरलोड दगड भरलेले असतात. दिवस रात्र रस्त्यावरून वाहतूक सुरु असते. मात्र पोलीस या ट्रक न पकडता हेल्मेट न घातलेल्या चालकांना पकडत आहे. मात्र अशी भरधाव होणाऱ्या ट्रक वाहतुकीकडे पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. कॅारीमुळे शेतीचं देखील नुकसान होत आहे. ही अवैध वाहतूक बंद व्हावी. डोंगर उतारावर आमची गावे असल्याने या ठिकाणी शेती होत नाही कुणी कुठे थोडीफार केली तर मात्र ऐकीकडे जंगली प्राणी तर दुसरीकडे या कॅारीचा त्रास आम्ह्यला सहन करावं लागत आहे. आमच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं आहे. ब्लास्टिंगमुळे जवळपास ९१ घरांना थडे गेले आहेत. दगड खाणींमुळे विहिरीचं पाणी कमी झालं आहे. जगायचे कसे आम्ही आमच्या जागेत बँकाकडून कर्ज काढून शेती करतो मात्र प्रशासनाने स्थानिकांना बाबत योग्य ती भूमिका न घेतल्याने योग्य ती भूमिका घेऊन भूमिपुत्रांना न्याय द्यावा”

अशी मागणी आमची आहे.

याबाबत स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं

“आम्ही सर्वानी आवाज उठवला मात्र सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांचे हात ओले झाले आहेत. मी माझं कर्तव्य पार पडलं आहे. यामध्ये दोन कॅारी आहेत एक दीपक पवार आणि दुसरी सचिन कदम यांची. या विषयात जिल्हाधिकारी देखील लक्ष देत नाही. याबाबत मी स्वतः गावकऱ्यांना भेटणार असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं”.

याबाबत आम्ही मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याजवळ संपर्क केला मात्र त्यांनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं आहे.

तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी म्हटलं

“दोन कॅारी आहे याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची परवानगी घेतली आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीबाबत चर्चा करून सुनावणी होणार आहे. अवैध वाहतुकीबाबत आम्ही पोलिसांना पत्र दिलं आहे. इथून पुढे कारवाई होणार आहे”.

कॅारी मालक सचिन कदम यांच्याजवळ सपंर्क केला असता त्यांनी म्हटलं

“आमच्या कॅारी बद्दल कोणाचीही तक्रार नाहीय. माझी कॅारी सुरु होऊन चार महिने झालेत. घराला जे तडे गेलेत ते पूर्वीच्या कॅारीमुळे गेलेत.माझी कॅारी गावापासून दीड किलोमीटर बाहेर आहे. सध्या दोन कॅारीमधून वाहतूक सुरु आहे. आमच्या कॅारीमुळे कोणाचाही नुकसान झालं नाहीय. या कॅारीमुळे कोणाची तक्रार नाहीय. माझ्या कॅारीमुळे एकाही शेतकऱ्यांचं नुकसान झालं नसून एकाही गावकऱ्यांची तक्रार नाहीय. माझे १५ ट्रक आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ही वाहतूक सुरु असते. आम्ही काळजी घेऊन ही वाहतूक करतो. सर्व जमीन मालकांनी मला संमती पत्र दिलं आहे. दोन किलोमीटरमध्ये शेतीची लागवड नाहीय, पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास होत नाहीय“.

याबाबत जमीनमालक अमरदीप परचुरे यांनी म्हटलं

“वरवेली गावात गेल्या तीन वर्षांपासून ही कॅारी सुरु आहे. गुहागरमध्ये LNT चा ब्रेक वॅाटरचं प्रोजेक्ट आहे त्यासाठी या कॅारी खोदल्या आहेत. याठिकाणी दोन कॅारी आहेत. मोठ्या प्रमाणात याठिकाणी काळ्या दगडाचं उत्खनन केलं जातंय. ज्या ठिकाणाहून ही वाहतूक सुरु आहे टी वाहतूक अनधिकृत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अटींचं पालन होता नाहीय. रात्री देखील ट्रक मार्फत वाहतूक आणि उत्खनन याठिकाणी सुरु असतं. ज्या भागातून ही वाहतूक सुरु आहे ती जागा आमची आहे मात्र अशी कोणतीही परवानगी न घेता ही वाहतूक सुरु आहे. वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने बागांचं नुकसान झालं आहे आमचं उत्पन्न कमी झालं आहे. त्यामुळे ही वाहतूक तात्काळ बंद व्हावी ही आमची मागणी आहे.”

आता गावकऱ्यांच्या मागण्यांकडे धनदांडगे आणि मंडल अधिकारी लक्ष देतील का हे पाहावं लागेल.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *