रत्नागिरी : नारायण राणेंसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कोकणात

banner 468x60

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २६ एप्रिलरोजी राजापूर दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे.


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये सध्या सर्वत्र महायुतीचे वातावरण असून ‘अब कि बार चारसो पार’, ‘फिरसे एक बार मोदी सरकार’ हा निर्धार करत महायुतीचे कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारात उतरले आहेत.

याच पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारी २६ एप्रिल रोजी भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजापूर दौऱ्यावर येत असून राजापूर शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर दुपारी ३.३० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी महायुतीचे उमेदवार राणे यांच्यासह बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे, शिवसेना लोकसभा प्रभारी किरण सामंत, माजी आ. बाळ माने, प्रमोद जठार, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव, कोकण प्रमुख वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष

अविनाश सौंदाळाकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा समन्वयक अजित यशवंतराव, आरपीआयचे उरणकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे असे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सांगितले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *