दापोली : 46 वर्षीय प्रौढाचा विहिरीत पडून मृत्यू

banner 468x60

आंबवली खुर्द येथे ४६ वर्षीय प्रौढाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. विजय शंकर शिगवण (आंबवली खुर्द) असे मृत प्रौढाचे नाव आहे. विजय शिगवण हे आंबवली खुर्द येथे वृध्द आईसह राहात होते.

३ मे रोजी विजय घरात कोणाला काहीही न सांगता वुठेतरी निघून गेले होते. संध्याकाळपर्यंत ते परत न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, परंतु ते कोठेही आढळून आले नाही. म्हणून त्यांची आई निर्मला शिगवण यांनी दापोली पोलीस स्थानकात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

दरम्यान, शुव्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शब्बीर कासम ऐनरकर हे मञ्जिद ऐनरकर यांच्या शेतात बकऱ्या चरण्याकरिता घेऊन गेले होते. तेव्हा विहिरीमध्ये कोणीतरी व्यक्ती मृतावस्थतेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांना तत्काळ पोलीस पाटील व पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पाहाणी केली असता तो मृतदेह विजय शिगवण यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

दापोली पोलीस स्थानकात याची तक्रार अनिल काशीराम शिगवण (आंबवली) यांनी दिली. पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *