दापोली तालुक्यात दु:खद घटना घडली आहे. खेर्डी फाटा येथे मतदान करून घरी परतत असणाऱ्या मोहिनी मधुकर केळकर ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय.
मंगळवारी सिलिंडरच्या भरलेल्या गाडीने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. कराड येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय.मोहिनी केळकर खेर्डी फाटा येथे पतीसह रहात होत्या.
मंगळवारी सायंकाळी ४ च्या सुमारास त्या मतदान करून आल्या. तब्येत बरी नसल्यामुळे मतदान झाल्यानंतर खेर्डी फाटा येथे दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करून घेतले.
त्यानंतर घरी परतत असताना रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या सिलिंडर भरलेल्या गाडीने केळकर यांना धडक दिली.
या धडकेमुळे केळकर या रस्त्यावर जोराने आपटल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चिपळूण येथे लाईफ केअर हॉस्पिटलला दाखल करण्यात आले.
मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने कराडला हलवण्यात आले. कराड येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. केळकर यांचा मृत्यू कराड येथे झाल्याने कराड पोलीस स्थानकात याची नोंद करण्यात आली आहे.
तेथून ही नोंद दापोलीकडे वर्ग करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*