Breaking News

दापोली : एकीकडे युतीचा प्रस्ताव आणि दुसरीकडे फोडाफोडी! भाजपचा मनसेला धक्का, मनसे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

banner 468x60

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याप्रमाणे तालुका पातळीवर फेरबदल पाहायला मिळत आहे.भाजपकडून एकीकडे युतीचा प्रस्ताव दिला जात असून, दुसरीकडे मनसेत दुसरीकडे फोडाफोडी केली जात आहे.

banner 728x90 banner 728x90

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मुंबई येथील रायगड निवासस्थानी हा प्रवेश झाला आहे.

मनसेचे माजी शहराध्यक्ष व ओम शिवभक्त मंडळ दापोलीचे अध्यक्ष राकेश माळी, रोहित शिंदे, संतू जैन, सागर तेली, पारस गुर्जर, ओंकार जैन, गजेंद्र माळी, प्रकाश तेली, कन्हैयालाल सुतार, ऋषभ कांबळे, किरण बामणे, रोहन विचारे, कुणाल जाधव, समीर कदम, रिंकू जयस्वाल, महेश बालगुडे, पृथ्वीराज शिंदे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केलाय.

रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य अक्षय फाटक, प्रदेश कार्यकारणी सदस्य रुपेश बेलोसे, तालुकाध्यक्ष संजय सावंत, कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वरूप महाजन, शहराध्यक्ष संदीप केळकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय शिंदे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *