दापोली – सायली नागे मृत्यू प्रकरण : खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री रामदास कदम, आमदार भास्कर जाधव काय म्हटले पाहा, कोकण कट्टा लाईव्ह इम्पक्ट

दापोली : सायली नागेच्या मृत्यूला जबाबदार कोण ? आई आणि बाळ कधी येणार? "ति" च्या 3 वर्षाच्या मुलीच्या प्रश्नांना उत्तर द्यायची प्रशासनाची आणि राजकीयांची हिंमत आहे का ?

banner 468x60

दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयांमधील भोंगळ कारभार कोकण कट्टा न्यूजने पुढे आणल्यानंतर खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री रामदास कदम, आमदार भास्कर जाधव या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी पाहा :

कोकण कट्टा लाईव्हने सायली नागे मृत्यू प्रकरणाबाबत बातमी केली असता हे प्रकरण चव्हाट्यावर आलं आहे. 28 वर्षीय महिलेचा गरोदरपणात मृत्यू झाला असून तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झालाय.

याबाबत कोकण कट्टाने सविस्तर पाठपुरावा केला आहे. अनेक वर्ष या रुग्णालयात तज्ञ डॉक्टर नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत. या प्रकरणाबाबत खासदार सुनिल तटकरेंनी तातडीने माहिती घेऊन प्रकरणाची दखल घेणार असल्याचं सांगितलं आहे.

माजी मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं बुधवारी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे मी स्वतः आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याजवळ याबाबत बोलणार आहे.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हा प्रकार गंभीर आहे. असं पुन्हा न होण्यासाठी विधानसभेत लक्षवेदी मांडणार आणि या प्रकरणाची माहिती घेतो असं सांगितलं आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *