दापोली : ए. जी.हायस्कूलची आर्या मुंडेकर तालुक्यात प्रथम

banner 468x60

दापोली शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए .जी.हायस्कूलची आर्या नितीन मुंडेकर हीने एस.एस.सी. परीक्षेत 97.60% गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

banner 728x90

तर आदिती अनिल जाधव हिने 97.40% गुण मिळवून तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. ए. जी. हायस्कूलमधील तब्बल 25 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.

विद्यालयातून 259 विद्यार्थी परीक्षेत बसले होते पैकी 254 विद्यार्थी पास होऊन विद्यालयाचा निकाल 98.06 इतका लागला आहे.


सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षकवृंद यांचे नियामक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर,संस्थेचे

सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी, स्कूल कमिटी चेअरमन रविंद्र कालेकर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सतीश जोशी, उपमुख्याध्यापक शरद कांबळे, पर्यवेक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *