दापोली : होर्डिंग मालकांचा माजुरडेपणा, दापोली नगर पंचायतीच्या नोटिशीकडे दुर्लक्ष

banner 468x60

घाटकोपरची घटना ताजी असताना राज्यातील सर्वच होर्डिंगचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मात्र काही ठिकाणी प्रशासकीय नोटीसला केराची टोपली दाखवली जाते. असाच प्रकार दापोली शहरात घडला आहे. दापोली शहरातील होर्डिंग प्रकरणी दापोली नगरपंचायतीने ज्यांच्या मालकीचे शहरात होर्डिंग आहेत त्यांना नोटिसा पाठवून उत्तर मागितले.

मात्र अद्याप एकाही होर्डिंगमालकाने उत्तर दिले नसल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे. या होर्डिंग मालकांचा माजुरडेपणा समोर आला आहे. अश्या जाहिराती लावून पैसा कमवणाऱ्या होर्डिंग मालक लोकांच्या जीवाशी खेळ करत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दापोली शहरात उपजिल्हा रुग्णालय आवार, गोडावून आवार, दापोली तहसीलदार कार्यालय आवार येथे शासकीय योजनांची माहिती देणारे होर्डिंग असून केळसकर नाका येथे खासगी मालकीची 4 होर्डिंग आहेत. खासगी होर्डिंग मालकांना नगरपंचायतीकडून नोटिस देण्यात आल्या आहेत.

मात्र त्यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नाही. त्यांना स्मरण पत्र पाठविण्यात येणार असून त्यालाही उत्तर न आल्यास पुन्हा दोन वेळा स्मरणपत्र पाठविण्यात येणार असून त्यालाही उत्तर न दिल्यास या होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे.

त्यासाठी झालेला खर्च या होर्डिंग मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या होर्डिंगबाबत तहसील कार्यालयाला पत्र देण्यात आले आहे का?

अशी विचारणा केली असता ते देण्यात आले नसल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली. त्यामुळे अश्या माजुरडेपणा करणाऱ्या होर्डिंग मालकांवर स्मरणपत्र न देता थेट कारवाई करावी अशी मागणी दापोलीकरांनी केली आहें

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *