दापोली सारंग मोहल्ला येथील गौसशेठ कुरूपकर यांच्या वीट भट्टीवर क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून मारहाण झाल्याची घटना १५ मे रोजी घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक शंकर मुकणे (४०, सारंग मोहल्ला दापोली मूळ दाभाड जांभिवली भिवंडी जिल्हा ठाणे) यांनी दापोली पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार १५ मे रोजी सकाळी ते व त्यांची पत्नी हे सारंग मोहल्ला येथील गौसशेठ कुरूपकर यांच्या वीटभट्टीवर कामाला गेले होते.
तेव्हा मधु (पूर्ण नाव माहित नाही) यांचा मुलगा देवा याने अशोक मुकणे यांना शिवी दिली मुकणे यांनी तू शिव्या का देतोस हे विचारून त्याची तक्रार करण्याकरिता पिंकी (पूर्ण नाव माहित नाही) हिच्याकडे गेले व तुमचा मुलगा काही कारण नसताना शिवी देत आहे अशी तक्रार केली.
तेव्हा पिंकी हिने मुकणे यांना शिवीगाळ करून हाताच्या थापटाने त्यांच्या पत्नीला मारहण केली. पत्नीला मारत असताना मुकणे हे सोडवण्यासाठी गेले असता मधु याने लाडकी दांडक्याने मुकणे यांना मारहाण केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















