दापोलीत देखभाल दुरुस्तीसाठी उद्या (सोमवारी) वीज पुरवठा बंद

banner 468x60

पावसाळीपूर्व कामं आणि देखभाल दुरुस्तीसाठी सोमवारी (20मे)ला दापोलीत वीज पुरवठा बंद राहणार आहे.

शहराला वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्यामुळे सोमवारी 20 मेला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती दापोली महावितरणच्या कार्यालयाने दिली आहे.

banner 728x90

कोकण कट्टाने याबाबत माहिती घेतली असता दोन टप्प्यात हे काम होणार असून जर कामलवकर पूर्ण झालं वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे दापोलीकरांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन दापोली शाखा कार्यालयाने केले आहे. त्यामुळे उद्या सोमवारी सकाळीच सर्व कामं आटपून घ्वावी लागणार आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *