चिपळुण : ढोंगी बुवाला बीअर पितानाच पकडलं ,फसवणुकीची तक्रार, चिपळूण पोलिसांची धाड

banner 468x60

शहरातील मार्कडी येथे भोंदूगिरी केल्याच्या आरोपाखाली दोघाना येथील पोलिसांनी दोन महिलांच्या सहकार्याने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गणेश बाबुराव वायकर (50, रा. मुदखेडा, ता. जामनेर, जि. जळगांव), अशोक देवराम जोशी (40, रा. वावडी, ता. जामनेर, जि. जळगांव) अशी पकडलेल्या अशी 2 संशयीत आरोपींची नावे असल्याचे पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

याबाबत पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी गणेश व अशोक हे दोघेजण गेल्या काही महिन्या महिन्यांपासून चिपळूणमधील मार्कडी येथील कुंजबन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकेत भोंदूगिरी करीत होते. याची माहिती घेऊन पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. यानुसार यातील एक महिला या दोघांकडेे गेली.

या दोघांकडे आपल्याला यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर या दोघांनी तुमच्यावर करणी केलेली आहे. ही करणी दूर करण्यासाठी 30 हजार रुपये लागतील तर व्यवसायात यश येण्यासाठी दीड लाख रुपये लागतील सांगितले. या प्रकाराने ही महिला अवाक झाली. यानंतर तिने याची माहिती आपल्याला मैत्रिणीला सांगितली.


यानुसार दुसरी महिला या दोघां आरोपींकडे गेली आणि तिने देखील आपल्याला यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर या दोघांनी तुम्हाला यश येण्यासाठी 50 हजार रुपये लागतील. तुम्ही पैसे घेऊन या, तुमचं काम करून देतो, असे सांगितले. हा प्रकार वेगळाच असल्याचे लक्षात आल्यानंतर या दोन महिलांनी चिपळूण पोलिस ठाण्यात आल्या. त्यांनी पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना सर्व माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी कुंजबन इमारतीवर या दोन महिलांसमवेत छापा टाकला. यावेळी करणी दूर करण्यासाठी लिंबूसारखे साहित्य रचून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि वैद्यकीय तपासणी करिता कामथे रुग्णालयात पाठवण्यात आले.

दरम्यान फिर्यादीचे जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *