रायगड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्या हस्ते भगवा हाती घेत शंकर साळवी यांनी रायगड जिल्हयातील इंदापूर येथे ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला.
यावेळी दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आम. संजय कदम, दापोली तालूका शिवसेना (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका सचिव नरेंद्र करमरकर, विभाग प्रमुख अनंत ऊर्फ रामू साळवी, आयुब मसुरकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकर साळवी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शंकर साळवींच्या या घर वापसीने दापोलीत शिंदे गटाला मात्र जोरदार धक्का बसला आहे.
दापोलीत सन 1986 पासून शिवसेना पक्षाचे कार्यालयीन कामकाज यशस्वीपणे सांभाळणारे आणि हर्णे जिल्हा परिषद गटाचे अनेक वर्ष विभाग प्रमुख म्हणून शंकर साळवी कार्यरत होते. मात्र मध्यंतरीच्या काळात शंकर साळवी यांनी येथील विदयमान आमदार योगेश कदम यांची साथ संगत धरली.
परंतु ती मुळ शिवसेना नसल्याने त्यांचे मन अजिबात रमले नाही. ज्या शिवसेनेचे अगदी प्रतिकुल परिस्थितीत बिजारोपणाच्या कामाचे रोपटे लावले. ते वाढविले त्या रोपटयाला वाऱ्यावर सोडणे म्हणजेच हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची ती प्रतारणा ठरेल.
याचा विचार करत शंकर साळवी यांनी पुन्हा आपल्या मुळ शिवसेना पक्षात बुधवारी रायगड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्या उपस्थित इंदापूर येथे स्वच्छेने पक्ष प्रवेश केला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















