दापोली आगार पोलीस मदत कक्ष धूळखात

banner 468x60

दापोली आगारामध्ये पोलीस मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु हे कक्ष पोलिसांविना असून

या ठिकाणी धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रवाशी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आगारातील प्रवाशांची वाढती गर्दी पाहाता चोऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्याचबरोबर आगारात येणाऱ्या अडचणी किंवा वाद यामुळे अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आगारामध्ये पोलीस कक्षाची निर्मिती करण्यात आली. परंतु या कक्षाचा वापरच होत नसून गेले अनेक दिवस या कक्षाची साधी साफसफाईही करण्यात आलेली नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दापोली आगारामध्ये प्रवाशांसाठी विविध सोयी उपलब्ध होत आहेत. परंतु त्याची देखभाल मात्र रामभरोसे असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलीस मदत कक्षाची स्वच्छता ठेवण्याची व येथे कायमस्वरपी पोलीस कर्मचारी नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *