रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कुणबी समाजोन्नती संघाच्या दापोली शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. सुनील तटकरे यांनी दापोली येथील कुणबी भवनाबाबत सविस्तर चर्चा करून हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे आश्वासन त्यांना दिले.

दापोली कुणबी समाजोन्नती संघ हा दापोलीत कुणबी समाज भवन असावे यासाठी गेल्या अनेक वर्ष प्रयत्नशील आहे. दापोली कुणबी समाजोन्नती संघाच्या दापोली शाखेची नुकतीच निवडणूक झाली.
यामध्ये पुन्हा गतवेळच्या सदस्यांची फेरनिवड झाल्याने आता हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा येथील कुणबी बांधव व्यक्त करीत आहेत. दापोलीतील कुणबी भवनाबाबत खासदार तटकरे यांनी आपण कुणबी भवन बांधणार असल्याचे अभिवचन कुणबी समाजाला दिले.
आजची राजकीय परिस्थिती पाहता स्थानिक आमदार व खासदार हे एकाच महायुतीतील घटक असल्याने हे काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा तटकरे यांनी बोलून दाखवली. दापोलीतील कुणबी भवन पुढच्या काही महिन्यातच उभे राहील, असा विश्वास तटकरे यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचीटणीस संदीप राजपूरे, दापोली शाखेचे अध्यक्ष रमेश पांगत, मोहन मुळे, नगरसेवक विलास शिगवण, उपाध्यक्ष जगदीश कलमकर, सूर्यकांत म्हसकर, महेंद्र जाधव आदी समाजबांधव उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















