दापोली: ती ईव्हीएम मशीन मुलांच्या खेळण्यातील

banner 468x60

दापोली तालुक्यातील गावतळे गावात ईव्हीएम मशीन सापडल्याची बातमी (दि.१६) सकाळी दापोली तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. 

त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. दापोलीपोलिसांनी थेट गावतळे गाठून ईव्हीएम मशीन सापडलेल्या ठिकाणी धाव घेतली. 

मात्र, पाहणीअंती त्या ईव्हीएम मशीन नसूनशाळेतील मुलांची खेळणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. देशातील आणि राज्यातीलप्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दापोलीतईव्हीएम मशीन सापडल्याची बातमी पसरली. याबाबत दापोली पोलीस यांच्याशी संपर्क साधला असता गावतळेत कोणतीहीईव्हीएम मशीन आढळून आलेली नाही. 

मुलांची शाळेची खेळणी आहेत. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीसयंत्रणा सर्व ठिकाणी चोख लक्ष ठेऊन आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *