दापोली : सोवेली मोहल्ल्यात दोन गटात हाणामारी, 11 जणांवर गुन्हा

banner 468x60

दापोली तालुक्यातील सोवेली मोहल्ला येथे शुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय.

banner 728x90 banner 728x90

दोन्ही गटाने परस्पर विरोधी तक्रार दाखल केल्यामुळे 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 3 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली.दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शीया इर्शाद टेटवलकर या सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःशीच बोलत होत्या.

तेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुगरा तय्यब टेटवलकर, तैमीना नदीम पावसकर याठिकाणी येऊन अर्शीया टेटवलकर हिला आमचं आम्ही बघून घेऊ असं बोलत वाद घालायला सुरुवात केली.

अर्शीया हिला हाताने मारण्यास सुरुवात केली. नाजनीन अबूबकर पावस्कर, नजमा दिलावर पावसकर, नसिमा तय्यब पावसकर, यास्मिन गणी बावस्कर आफरीन सावरटकर फरीन या सर्वांनी मिळून अर्शीया टेटवलकर हिला मारहाण केली. या मारहाणीत अर्शीया हिच्या पायाला दुखापत झाली.

त्या वेळेला नाजनीन अबूबकर पावसकर हिने तुला कोठे तक्रार द्यायची ते दे आम्ही कोणाला घाबरत नाही तू तक्रार दिली तर तुला मारून टाकू अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. याची फिर्याद आरशिया टेटवलकर हिने दापोली पोलीस स्थानकात दिली.

या तक्रारीनुसार आठ जणांवर भादवि कलम 143, 147, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


याच प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मारहाणीत फिर्यादीचा ड्रेस मागून फाडून त्याचे नुकसान करून अल्फिया इर्शाद टेटवलकर, इकरा इर्शाद टेटवलकर यांनीही फिर्यादीला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली होती.

फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादीनुसार तिघांवर भादवि कलम 324, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *