दापोली : संख्या पोवार यांचा राष्ट्रवादी काँगेस पवार गट रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

banner 468x60

राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा संख्या गुरुप्रसाद पोवार यांनी राजीनामा दिला आहे.

काही महिन्यापूर्वीच त्यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली होती. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्हा पातळीवर फेरबदल पाहायला मिळत आहे.

यामध्येच दापोली तालुक्यात अंतर्गत पक्षीय घडामोडी पाहायला मिळत असून येणाऱ्या काही दिवसात राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत.

येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संख्या पोवार यांचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *