शिवसेना (उबाठा) पक्षाचे दापोली खेड मंडणगड मतदारसंघाचे संपर्क प्रमुख या पदाचा रूपेश बेलोसे यांनी पक्षाकडे आपला राजीनामा दिला आहे.
लवकरच तेही भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
रुपेश रमाकांत बेलोसे हे गेल्या दीड वर्षांपासून शिवसेनेच्या (उबाठा) संपर्क प्रमुख पदावर कार्यरत होते. विधानसभेतील ग्रामीण तसेच मुंबई स्थित लोकांना एकत्रित आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
पक्षानं वेळोवेळी दिलेली जबाबदारी ते पार पाडत होते. त्यांनी राजीनामा पत्रात पक्ष सोडण्याचं कारण वैयक्तिक दिलं आहे. पण माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या पक्ष सोडल्यानंतर तेही पक्ष सोडून भाजपात जाणार याची कुणकुण सर्वांनाच होती.
आता रूपेश बेलोसे हे येत्या दोन दिवसांतच भाजपामध्ये दाखल होण्याची माहिती सुत्राकडून मिळत आहे .

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















