रत्नागिरीतील दापोलीत हिंदूंबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टनंतर दापोलीत तणाव निर्माण झाला.
जॉइन कोकण कट्टा लाईव्ह व्हॉट्सअप ग्रुप 👇🏻
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
पोस्ट करणाऱ्या 4 जणांनापोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या पोस्टनंतर दोन गटात तणाव निर्माण झाला.
मात्र पोलिसांनी या आरोपींना जनतेसमोर आणून माफी मागायला लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमाव शांत झाला.
पोलिसांनी तातडीने परिस्थिती आटोक्यात आणली आहे. या वादग्रस्त पोस्टबाबत चारही जणांनी माफी मागीतली असून सोशलमीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे दापोलीत काहीवेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
या ठिकाणीतात्काळ दापोली पोलीसांनी येऊन ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणली आहे. दापोलीत सध्या शांतता आहे. आवश्यक त्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
तसेच सोशल मीडियाद्वारे समाजात तेढनिर्माण होणारे संदेश प्रसारीत करु नयेत. जेणेकरुन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
कोणताही अनुचितप्रकार घडू नये यासाठी सतर्क व दक्ष राहून काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असंआवाहन दापोली पोलिसांनी केलं आहे. सध्या दापोलीत शांतता आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













