दापोली : संख्या पोवार यांची युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

banner 468x60

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर ८ नेत्यांनी शिवसेना-भाजपच्या सरकारला समर्थन दिलं.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. यानंतर दोन्ही गटात नियुक्तींचा धडाका पाहायला मिळत आहे.

दापोली तालूक्यात देखील हे फेरबदल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती शरद पवार , सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्या आहेत.

यानूसार सर्वच जिल्ह्यात आणि तालूक्यात हे बदल पाहायला मिळत आहे. दापोली तालूक्यात संख्या गुरुप्रसाद पोवार यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या सहीने संख्या पवार यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. संख्या पोवार यांच्या नियुक्तीमुळे तालूक्याचं राजकारण कसं बदलणार आहे हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. या नियुक्तीमुळे सर्वत्र त्यांचं अभिनंदन केलं जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *