दापोली : डंपर दुचाकी अपघातात तिघे जखमी

banner 468x60

दापोली तालुक्यातील रोवले येथे झालेल्या दुचाकी व डंपर यांच्या अपघातात पांडुरंग महाडिक, दिनेश बालगुडे व महेश बालगुडे हे जखमी झाल्याची घटना १० जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी पांडुरंग महाडिक दिनेश बालगुडे व महेश बालगुडे हे तिघेजण दुचाकी वर ट्रिपल सीट बसून आंबवली ते डौली असा प्रवास करत होते.

ही मोटारसायकल महेश बालगुडे चालवीत होता. मोटारसायकल रोवले शेवाळे फाटा या ठिकाणी आली असता बेदरकारपणे मोटारसायकल वेगाने चालवून समोरून येणारा दहा चाकी मायनिंगच्या डंपरला डिझेल टाकीजवळ जोरदार धडक देऊन अपघात झाला.

या अपघातामध्ये महेश बालगुडे यांना दुखापत झाली तसेच पांडुरंग महाडिक यांच्या नाकाला व डोक्याला तसेच डाव्या पायाला दुखापत झाली दिनेश बालगुडे यांच्याही पायाला दुखापत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *