आगामी निवडणुका माही महिन्यावर असताना दापोलीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा सूर्यकांत दळवींच्या भाजप प्रवेशाची चर्चा नव्याने रंगली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपमध्ये जाणार आहेत असं असलं तरी यावर अजूनही शिक्कामोर्तब झालं नाहीय.
दापोली मतदारसंघाचे सलग पाच वेळा आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराज असल्याचे चित्र सध्या मतदारसंघामध्ये जोरदारपणे रंगलं आहे.
पण अनेक जाणकारांचं ये मत आहे की त्यांनी भाजपमध्ये जावं हे त्यांना सोईस्कर ठरेल कारण उबाटा गटात माजी आमदार संजय कदम आल्याने सूर्यकांत दळवींची दुहेरी कोंडी होऊ शकते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सध्या कोणताही निर्णय घेताना सूर्यकांत दळवी यांना विश्वासात घेतलं जात नाही अशी चर्चा दापोलीच्या कार्यकर्त्यानमध्ये रंगलीय.
दळवी पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत अशी माहिती, त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सूर्यकांत दळवी हे भाजपमध्ये खरंच जाणार का? हे पाहावं लागणार आहे. पण कार्यकर्त्यांशी मात्र ते सल्लामसलत करत आहेत मी जर पक्ष सोडून गेलो तर तुम्ही माझ्यासोबत येणार का? अशीही चर्चा आहे. आपल्या जवळच्या मंडळींना फोन करून ते भाजपामध्ये येण्याबाबत विचारणा करत आहेत.
त्याबरोबरच भाजपमध्ये जाणं हे योग्य राहील का? याबद्दलही ते जवळच्या कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेत आहेत. भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा ते आपल्या पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. खेड आणि मंडणगड मध्ये देखील सूर्यकांत दळवी लवकरच पक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
भाजपचे कार्यकर्ते सूर्यकांत दळवी हे लवकरच प्रवेश करणार असल्याच्या बातमीला एक प्रकारे दुजोराच देत आहेत. अक्षय फाटक यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.
त्याचवेळी सूर्यकांत दळवी हे देखील आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदारपणे होती. परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















