जागतिक योग दिनाच्या निमित्ताने दापोलीतील प्रसिद्ध योगगुरु दिनानाथ कोळेकर यांनी नॅशनल हायस्कूलमध्ये योगासनाचे विविध धडे विद्यार्थ्यांना दिले.
या ठिकाणी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी कोळेकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षिक स्वरूपात करून दाखवले. कोणती योगासने केल्याने कोणता आजार दूर होतो, याविषयीची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना योगा करण्याचे फायदे समजावून सांगितले .विद्यार्थ्यांबरोबरच हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील कर्मचाऱ्यांनी देखील योगासने केली. विद्यार्थ्यांना योगासनाविषयी अनमोल स्वरूपात मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्याध्यापक मुल्ला यांनी कोळेकर यांचे आभार मानले.
या वेळी शाळेतील जेष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत, ज्येष्ठ शिक्षक रियाज म्हैशाळे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.रवींद्र कदम, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. अस्मिता कानडे, कला विभाग प्रमुख प्रा. जमीर जमादार यासह सर्व हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













