दापोलीमधील लोकसभा मतदान लाईव्ह होणार, मतदारसंघातील सर्व यंत्रणा सज्ज

banner 468x60

रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण ३७१ मतदान केंद्रामध्ये दिनांक ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. १८६ मतदान केंद्रावरील मतदानाचे लाईव्ह प्रक्षेपण वेब कास्टिंग द्वारे होणार आहे. शहरी भागात २७ मतदान केंद्रे आहेत तर ग्रामीण भागात ३४८ मतदान केंद्रे आहेत.

आतापर्यंत २ लाख ७९ हजार ९०४ मतदार यांची नोंद मतदार यादी मध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण १३४५८३ पुरुष आणि १४५३२१ महिला मतदार यांचे प्रमाण आहे. दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.

सदर मतदार यादी मध्ये ४११७ मतदार हे ८५ पेक्षा जास्त वय असलेले मतदार आहेत तर १२७५ हे दिव्यांग मतदार आहेत. या निवडणुकीमध्ये ८५ पेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग मतदार घरी टपाली मतदान करणार आहेत.

दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत ६६३ मतदार अशा प्रकारे मतदान करणार आहेत. निवडणुक चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मतदार संघाची ६० सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली असुन प्रत्येक सेक्टरसाठी एक सेक्टर ऑफिसरची नुियक्ती करण्यात आलेली आहे.

आचारसंहिता कक्ष सज्ज करण्यात आलेला आहे एकूण १८ भरारी पथके तसेच १० व्हिडिओ सर्वेक्षण पथके आणि ३ व्हिडिओ पाहणी टीम कार्यरत आहेत. आज पासून एकूण ७ ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळाचे पहिले प्रशिक्षण ७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेले असून सदर प्रशिक्षणामध्ये एकूण १७७५ जणांनी प्रशिक्षण घेतले. मतदाना दिवशी नियुक्त कर्मचारी यांना टपाली मतदानाची प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पार पाडण्यात येणार आहे.

दुसरे प्रशिक्षण २८ आणि २९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे याच दिवशी निवडणूक नियुक्त कर्मचारी यांना फॅसिलिटेशन सेंटर वरती मतदान करता येणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैया या सभागृहाजवळ निवडणुकीसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सुरक्षित स्ट्राँग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत.

निवडणुकीत मतदान टक्का वाढवण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहेत. मतदान केंद्रावरती सर्व प्रकारची सुविधा पुरविण्यात येणार आहे. निवडणुक प्रशासनामार्फत नागरिकांना ७ मे २०२४ रोजी मोठया प्रमाणात मतदानात सहभागी होण्याबाबत आवाहान करण्यात येत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *