दापोली : अधिकाऱ्यांच्या घरी AC ची हवा, सर्वसामान्य काय करणार ? दापोली, खेडमध्ये महावितरणचा नियोजनशून्य कारभार

banner 468x60

खेड आणि दापोली तालुक्यात पावसाच्या तोंडावरच महावितरणचा विस्कळीत कारभार पाहायाला मिळत आहे. सुरुवातीच्या पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार विस्कळीतच झाला आहे.

banner 728x90

पाऊस सुरू झाल्यापासून खेड,दापोली शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरणने मान्सूनपूर्व कामांसाठी वीजपुरवठा खंडित करत देखभालीची कामे देखील पूर्ण केल्याचा दावा केला आहे.

गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मात्र पहिल्याच पावसात महावितरणचा गोंधळाचा कारभार समोर आला आहे. कोणत्याही क्षणी खंडित होणार्‍या वीजपुरवठ्याची छोट्या व्यावसायिक आणि कुटुंबाना झळ बसत आहे.

दिवसातून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुग्धजन्य विक्रेते, आईस्क्रीम व खाद्यपदार्थांचे विक्रेते यांच्यासह झेरॉक्स दुकान व्यावसायिकांनाही याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

याशिवाय इतर व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत. एकीकडे वीजबिल भरणा न केल्यास महावितरणकडून तातडीने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.

मात्र सातत्याने खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे ग्राहक आणि कुटुंब मेटाकुटीस आलेले असतानाही सुरळीतपणा आणण्यासाठी महावितरणकडून अजूनही ठोस कार्यवाही केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काहींच्या घरी इन्वटर आहेत त्यामुळे त्यांना याची झळ बसत नाही मात्र सर्वसामान्य माणसांना महावितरणच्या या अजब कारभाराचा त्रास सहन करावा लागत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *