दापोली : संजय कदमांकडे उद्भव ठाकरेंनी दिली नवी जबाबदारी, रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी संजय कदम

banner 468x60

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील घडामोडी बदलण्यास सुरुवात झालीय. सर्वच पक्ष आता पक्ष संघटेनेंकडे लक्ष देण्यासाठी पक्षांतर्गत बदल करत आहेत.

अनंत गीतेंसाठी माजी आमदार संजय कदम हे स्टार प्रचारक होते. अनंत गीतेंसाठी संजय कदम यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्हा पिंजून काढला आहे.

याचाच फायदा आगामी विधानसभेला होण्यासाठी उद्भव ठाकरेंनी संजय कदम यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिह्यातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

संजय वसंत कदम उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख म्हणून यापुढे काम पाहणार आहेत. याचा फायदा पक्षाला आणि स्वतः संजय कदम यांना ही विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत संजय कदम विरुद्ध योगेश कदम असा सामना पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *