दापोली : रिक्षा-कार अपघातात तिघेजण जखमी

banner 468x60

दापोली तालुक्यातील वाकवली येथे रिक्षा व सेंट्रो कारमध्ये झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह दोघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.

banner 728x90


दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शिगवण (४१, कुंभवे शिगवणवाडी) हे रिक्षा (एमएच ०८ एक्यू ३९७८) घेऊन सुकदर ते वाकवली असे प्रवासी घेऊन जात होते.

ते वाकवली शाळेजवळ आल्यानंतर दापोलीकडून खेडकडे सेंट्रो कार (एमच ०४ सीडीसी ४५०२) घेऊन जाणारा सुभाष सीताराम राठोड (३२, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, जालगाव) यांना गाडीचा वेग आवरता न आल्याने त्यांनी रिक्षाला ठोकर दिली.

यामध्ये रिक्षा चालक संतोष शिगवण यांच्यासह प्रवासी संजय तुकाराम नवलू (४४, कुंभवे), सुमित्रा रामजी कोळंबे (७२, सुखदर) हे तिघेजण जखमी झाले.

या बाबत संतोष शिगवण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुभाष राठोड याच्यावर भादंवि २७९, ३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *