दापोली : रामराजे ज्युनिअर कॉलेजमध्ये पालकसभा

banner 468x60

रामराजे ज्यु. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स दापोलीमध्ये पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शैक्षणिक वर्षात घेण्यात येणारे उपक्रम, विद्यार्थ्यांच्या या गुणवत्तावाढीसाठी राबवण्यात येणारे विशेष उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

या सभेमध्ये शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे व भारत सरकारमार्फत मिळणाऱ्या वेगवेगळ्या शिष्यवृत्या त्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची सविस्तर माहिती प्रा. संतोष येसावरे यांनी उपस्थित पालकांना दिली.

महाविद्यालयीन स्तरावर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी लागणारे दाखले वेळेत पूर्ण होण्यासाठी दाखले कॅम्पचे आयोजन केले जाईल.

पालकांनी मुलांना यशस्वी करण्यासाठी, त्यांना सर्वोत्तम बनवण्यासाठी पाल्याकडे नियमित लक्ष ठेवून सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य वेदिका राणे यांनी उपस्थित पालकांना केले.

महाविद्यालयाच्या प्रा. क्षितिजा गोडबोले, रेश्मा तांबे, शेफाली मोहिते उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *