दापोली : किरीट सोमय्या यांच्या कारवाईनंतर दापोलीतल्या साई रिसॉर्टला ‘ईडी’ने टाळे ठोकले

banner 468x60

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंधित दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीची नजर वळली. या रिसॉर्टच्या बांधकामात ‘सीआरझेड’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत रिसॉर्टला सील ठोकले.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचाही संशय आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत होते. साई रिसॉर्ट हे परब यांच्या मालकीचे असून त्याचे बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

त्यानंतर सोमय्या आणि परब यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली होती. मात्र, सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या रिसॉर्टचे मालक आपण नसल्याचा खुलासा परब यांनी केला होता. त्यानंतरही या प्रकरणात परबांची कोंडी करण्यासाठी सोमय्या यांनी हातात हातोडा घेऊनच यात्रा काढली होती.

त्यावरून भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) आमने-सामनेही आले होते. यानंतर या साई रिसॉर्टच्या प्रकरणामध्ये इडीची एन्ट्री झाली होती.

हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहचलं. या प्रकरणामध्ये अनिल परबांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलेले आहे. तसेच रिसॉर्टच्या बांधकामामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला असून हायकोर्टात ईडीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *