दापोली : वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चोरीला

banner 468x60

झोपेत वृद्ध महिलेचा खून करुन तिच्या अंगावरील साेन्याची माळ चोरुन नेल्याची घटना विसापूर – मधलीवाडी (ता. दापोली) येथे घडली आहे.

banner 728x90 banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दीपावती सीताराम घाग (८७) असे वृद्धेचे नाव असून, हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीला आला. दागिन्यासाठीच हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकाराबाबत या महिलेच्या मुलाने फिर्याद दिली आहे. दीपावती घाग या वयोवृद्ध आणि आजारी होत्या. त्या विसापूर येथील मधलीवाडीतील विश्रांतीनगर येथे एकट्याच राहत होत्या.

हा खून रविवारी (१६ जुलै) ते सोमवारी (१७ जुलै) सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दीपावती घाग या रविवारी रात्री घरामध्ये झोपल्या होत्या.

त्यांच्या वयोवृद्ध व आजारपणाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्याने वृद्धेच्या छातीवर जोराचा प्रहार करून त्यांचा खून केला.

त्यानंतर त्याने महिलेच्या गळ्यातील ७८ हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चाेरून नेल्याचे समोर आले आहे.

वृद्धेच्या खुनाच्या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, याबाबत दापोली पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करुन मारेकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *