दापोली : आणि तो प्रवास अखेरचा ठरला, मीरा बोरकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

पंधरा दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आसूद येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. यापैकी मीरा महेश बोरकर हिची एक्झिट चटका लावणारी ठरली आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

अत्यंत हुशार असलेली मीरा सीईटीच्या परीक्षेत तब्बल ९६ टक्के गुण मिळवून चमकलेली होती. महाविद्यालयाचा फॉर्म भरण्यासाठी ती दापोली येथे आली होती.

एसटी बस कॅन्सल झाली म्हणून ती रिक्षात बसली अन् तो प्रवास अखेरचाच ठरला.मीराला मुंबई येथे आयटी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता.

यासाठी तिने गेल्या वर्षी ९३ टक्के मार्क मिळाल्यानंतरही एक वर्षाची शैक्षणिक गॅप घेतली व यावर्षी जिद्द बाळगत सीईटीमध्ये त्याहून तीन टक्के अधिक मार्कही मिळवले. पाडले गावात मोबाईलला व्यवस्थित नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलवर ओटीपी येत नव्हता.

त्यामुळे फॉर्म भरण्यास अडचणी येतात, म्हणून ती दापोली येथे महाविद्यालय प्रवेशाचा ऑनालाइन फॉर्म भरण्यासाठी आली होती. दापोलीत हा फॉर्म भरून झाल्यानंतर त्याच दिवशी केळशी मार्गावर धावणारी दुपारी सव्वा बाराची एसटी पकडण्यास ती निघाली.

परंतु बस कॅन्सल झाल्यामुळे मीरा वडापमध्ये बसली अन् तिथेच घात झाला. मीरा फॉर्म भरत असताना दापोली येथील मूळचे पाडले गावातील त्यांचे शेजारी असलेले पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र सातनाक यांचीही तिच्याशी योगायोगाने भेट झाली होती.

त्यांनी तीला आपण बरोबर घरी जाऊ, मी माझं काम आटपून येतो, असंही सांगितलं. मात्र काही वेळाने तिला वडिलांचा फोन आला. सातनाक काकांना घरी येण्यास उशीर होईल, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे तिने वडापने येण्याचं ठरवलं. वडाप रिक्षेने मीरा प्रवास करत होती.

त्याच गाडीचा आसूद येथे भीषण अपघात झाला. यातच दुर्दैवाने मीराचा मृत्यू झाला. अत्यंत हुशार असलेल्या मीराने अशाप्रकारे घेतलेली अकाली एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली आहे. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मीराने गेल्या वर्षी सीईटीची परीक्षा दिली होती.

त्यावेळी तिला ९३ टक्के मार्कही पडले होते. मात्र हे मार्क्स तिच्या मनासारखे नव्हते. म्हणून गेल्या वर्षी तिने एक वर्षाचा गॅप घेतला. आपल्याला हव्या त्या महाविद्यालयात तिला मुंबईत प्रवेश घेता आला नव्हता, म्हणून तिने यावर्षी पुन्हा जोमाने सीईटीची परीक्षा दिली.

त्यात तिला तब्बल ९६ टक्के मार्क पडले होते. या आयआयटी प्रवेशासाठी महाविद्यालयाचा फॉर्म भरण्यासाठीच ती दापोलीला आली होती आणि हा प्रवास तिचा दुर्दैवाने अखेरचा ठरला. पाडले येथील इयत्ता पहिली ते पाचवी जिल्हा परिषद शाळेनंतर दापोलीच्या आर आर वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल येथे तिचे शिक्षण झाले.

अकरावी बारावी तिने रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पूर्ण केले होते. त्यानंतर आयटीमध्ये प्रवेश घ्यायचा असल्याने तिने सीईटीची परीक्षा दिली. मीराचे वडील शेतकरी आहेत. तिच्या पश्चात आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे. याचवेळी पाडले येथे घरी जाण्यासाठी निघालेली शेजारची भार्गवी दापोली एसटी बस स्टँडमध्ये आली होती.

तिने एसटी सुटण्यासाठी तब्बल दुपारी तीन वाजेपर्यंत वाट पाहिली, मात्र मीरा बोरकर हिला मामाने एसटी कॅन्सल झाल्याने वडाप रिक्षाने जाण्यासाठी सोडले होते. ती यापूर्वी एसटी शिवाय कधीच प्रवास करायची नाही, मात्र तिने घेतलेल्या एक्झिटला एसटी प्रशासनाचा बेजबाबदार व भोंगळ कारभारही तितकाच कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. जर मीरा एसटी स्टँडवर आली असती व भार्गवीशी तिची भेट झाली असती,

तर या दोघींनी एकत्रच दुपारी तीन वाजता सुटणाऱ्या एसटी बसमधून प्रवास केला असता, पण निष्ठूर नियतीने हे होऊ दिले नाही. मीराची आठवण आली आणि मैत्रिणींना रडू कोसळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *