दाभोळ : जलजीवन मिशनचं काम युद्धपातळीवर सुरू, जिल्ह्यात 700 कोटी निधीची तरतूद

banner 468x60

जलजीवन अभियानात रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. त्यातील अंतिम टप्यात असलेली १३५ कामे वेगाने सुरू आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील २७९ योजना पूर्ण करण्यात यश आले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होणार आहे.

banner 728x90 banner 728x90

केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत १,४७५ योजनांचा आराखडा बनविण्याचे निश्चित केले होते. प्रत्यक्षात १ हजार ३४३ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

यासाठी सातशे कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत ९७५ कामे पूर्ण करायची आहेत. आतापर्यंत ३० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झालेली ४७० कामे आहेत. ५० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झालेली २१२ तर ७० टक्क्यांपेक्षा पूर्ण झालेली १५८ कामे आहेत. तसेच अंतिम टप्प्यात असलेली १३५ कामे आहेत.

जिल्हा प्रशानसनाने कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यानुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून ठेकेदारांना कामांची मुदतवाढ देताना तसेच देयके तयार करताना कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

ठेकेदारांना केलेल्या कामाचे बिल मिळत नसल्यामुळे पुढील काम करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ठेकेदारांनी केलेल्या कामाचे नियमानुसार देयक दिल्यास पुढील कामे वेळेत पूर्ण होतील.

दरम्यान, जलजीवन मिशनचा कार्यक्रम पंचवार्षिक असून, मार्च २०२५ पर्यंतची मुदत आहे. मात्र उन्हाळ्यातील पाण्याची तीव्रता लक्षात घेऊन कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून मार्च २०२४ पर्यंत मुदत निश्चित करण्यात आली आहे.

त्यामुळे लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाकडून कामांची फेर पाहणी जलजीवन मिशनमधील योजनांची कामे वेगाने पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून, काही भागात प्रशासनाकडून कामांची फेर पाहणीही सुरू केली आहे. योजनअंतर्गत चिपळूण

तालुक्यात १०८, दापोलीत १०५, गुहागर मध्ये ८७, खेड तालुक्यात १५९, लांजात ६४, मंडणगड ५६, राजापूर तालुक्यात राजापूर ११९, रत्नागिरीमध्ये १२१ आणि संगमेश्वर तालुक्यात १५६ कामे प्रगतिपथावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *