दाभोळ : गळफास लावून वृद्धाची आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील दाभोळमधील दालेश्वर पाखाडी येथे चंद्रकांत शंकर पानकर या 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पानकर यांना दारूचे व्यसन होते त्यातच सहा महिन्यापासून त्यांना डोळ्यांचा त्रास झाल्याने आणि व्यवस्थित दिसत नसल्यामुळे घरातून बाहेर पडता येत नव्हते.

त्यामुळे ते दिवसभर घरीच होते. दारू पिण्याकरता जाता येत नाही, याचा त्यांना मानसिक त्रास होत असल्याने दोन दिवसापूर्वी दुपारच्या सुमारास घरात सर्वांसोबत दुपारचे जेवण केले.


जेवण झाल्यानंतर घराच्या पाठीमागील पडवीत लाकडी भालाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. दाभोळ पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *