– Editor : Tejas Borghare
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
दाभोळ कन्या शाळा प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. जि.प.कन्या शाळेचे काम प्रथम प्राधान्य देऊन पुर्ण करण्याचं पत्र शिक्षण विभागाने बांधकाम विभागाला दिलं आहे.
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
दाभोळ कन्या शाळा प्रकरणी पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उपोषण केलं होतं. अखेर दाभोळ कन्या शाळेचं काम करण्याचे आदेश शिक्षण विभागाने बांधकाम विभागाला दिले आहेत.

तौक्ते वादळातील सन २०२२-२३ व CSR मधील सन २०२३-२४ जि.प.कन्या शाळेचं काम २८ फेब्रुवारी, २०२४ अखेर पुर्ण करण्यास सांगितलं आहे.

दाभोळ ग्रामपंचायत आणि पालकांमध्ये विद्यार्थ्यांनी कुठे बसावं यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्येच हे पत्र या विषयाला कलाटणी देणारा ठरलेला आहे. शाळेचं काम पूर्ण करण्यासाठी एकूण ४ लाख मंजूर झालेले आहेत.
तौक्ते वादळातील सन २०२२-२३ मध्ये जि.प.कन्या शाळा दाभोळ करीता शाळा दुरुस्तीसाठी रक्कम रु.२.०० (लाख) मंजूर, तसेच CSR मधील सन २०२३-२४ करीता शाळा दुरुस्तीसाठी र.रु.२.०० (लाख) मंजूर असे एकूण ४ लाख मंजूर करण्यात आले आहेत.
नाव न घेण्याच्या अटीवर बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी
कोकण कट्टा लाईव्हशी बोलताना म्हटलं ” आम्ह्यला हे पत्र मिळालेलं आहे.

आम्ही तात्काळ काम करण्यास सांगितलं आहे. याबाबत आम्ही ग्रामपंचायत दाभोळ यांना कळवणार असून मागच्या वेळेसारखा घोळ न होण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाची मदत घेणार आहोत.” असं कोकण कट्टा लाईव्हशी बोलताना या अधिकाऱ्यांनी म्हटलं.

याआधी दाभोळ कन्या शाळा प्रकरणाची चौकशी करून योग्य निर्णय देण्याचं आश्वासन देखील अधिकाऱ्यांनी दिलं होतं. जिल्हा परिषद बांधकाम चिपळूण या प्रकरणी कार्यकारी अभियंता ९ फेब्रुवारीला दाभोळला येऊन योग्य निर्णय देण्याचं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं होतं.
अहवाल सादर झाल्यानंतर दाभोळ कन्या शाळेचं काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान हे काम २८ फेब्रुवारी, २०२४ अखेर पूर्ण झालं नाहीतर अखर्चीत असलेला निधी शासनाकडे जमा करणं बंधनकारक राहील या कारणास्तव सदरील कामाबाबत कोणतीही मुददतवाढ दिली जाणार नाही.
असं या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयाकडून सदरील जि.प.कन्या शाळेचे काम प्रथम प्राधान्य देऊन पुर्ण करण्यास सांगितलं आहे.
दरम्यान शिक्षण विभागाने बांधकाम विभागावर ताशेरे ओढले असून ऐवढे पत्रव्यवहार करुन देखील सदर शाळेचे काम प्रलंबीत राहिल्यास आणि निधी परत गेल्यास त्याची सर्वस्वीः जबाबदारी कार्यालयाची राहील असं या पत्रातून सांगण्यात आलं आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















