चिपळूण : हॉटेल मधुरा शिवसागरमध्ये हजारोंचा ऐवज लंपास

banner 468x60

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील हॉटेल मधुरा शिवसागर या हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

कॅश काउंटर मधील रोख रक्कम तसेच मोबाईल असा एकूण ३६ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.

मध्यरात्रीनंतर ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या संदर्भात रवींद्रा तुक्रा शेट्टी यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय बाजूला असलेल्या मधुरा शिवसागर हे हॉटेल असून येथे मध्यरात्री १.३० नंतर अज्ञात चोरट्याने किचन मधील एक्जोस फॅनच्या जागेतून आतमध्ये प्रवेश केला

आणि हॉटेल च्या कॅश काऊंटर पर्यंत पोहचून कॅश काउंटर मधील ३२ हजार ४६० रोख रक्कम तसेच २५०० रुपयांचा मोबाईल असा एकूण ३४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल

चोरट्याने लंपास केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *